Friday 25 April 2014

'आयुर्वेद : गुणकारी ? दुर्लक्षित ? कि निव्वळ बंडलबाजी ? ' 

                                                 तथ्य किती सत्य किती 


नमस्कार
आयुर्वेदाविषयी लिहिलेला लेख वाचून प्रथम मनात सात्विक संताप आला. नंतर लेखावर चालालेली साधक बाधक चर्चा बघून विविध जनांच्या मनामधील समज गैरसमज बघून मनाला दुःख झाले.
आपल्यादेशातील सुशिक्षित बुद्धिवादी जनतेच्या मनात आपल्याच आयुर्वेदाविषयीचे भयंकर गैरसमज आहेत व योग्य माहिती मिळण्याचा मार्ग नाही अशी अवस्था आहे. ज्याप्रमाण विषयी  अभ्यास नाही अशा विषयावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्याना प्रमाण मानणारे लोक बघून मन खिन्न झाले.
धर्मं की विज्ञान  या वादामधून मूल प्रश्न न सुटता गुंता गुंत अधिक वाढणार आहे.
म्हणून आयुर्वेदाविषयीमाहिती आयुर्वेदा चा अभ्यासक्रम पूर्ण केलेला व आयुर्वेदाची चिकित्सा करणारच देऊ शकेल असे वाटते.

लेखावर नुसती टीका झाली मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष जाले अस अनेकांचा मत दिसलं
या लेखात करण्यात आलेल्या मुळ मुद्द्यात किती तथ्य आहे हे आपण बघू
आरोप
१ आयुर्वेदिक औषधाने १००% केन्सर रोग बरा होतो अशी विधाने.व् आयुर्वेदिक औषध क्लिनिकल ट्रायल मधे नापस होते म्हणून आयुर्वेद बंडलबाज़ी आहे
उत्तर 
- आयुर्वेदच काय पण कुठल्याही pathy मध्ये अशी विधाने करणे हा कायद्याने गुन्हा आहे.  त्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.

 कुठलीही चिकित्सा  करणारा  डॉक्टर अथवा वैद्य  RMP Registered medical practitioner  आहे का नाही हे बघणे सरकारचे काम आहे. त्यानी केलेले claims ची सत्यता तपासली पाहिजे

वैयक्तिक स्वार्थासाठी मैच फ़िक्सिंग करून तुरुंगात जाणारे अनेक क्रिडापटु आपण बघतो, असा  माणूस चुकल्यामुले संपूर्ण क्रिकेट किंवा फुटबॉल सारखा क्रीडा प्रकार बोगस आहे असे म्हणून तो बंद केला जात नसतो.

 त्यामुळे अशी मोठ्मोठ्ली विधाने करणार्यांचा निषेधच आहे.

आयुर्वेदात  केन्सर bp डायबेटीस असे रोग वर्णन केले नसले तरीही त्यासंबंधी चिकित्सा कशी केली जाते याचा  विचार समजून घेऊया.

आयुर्वेदाच्या निदान पद्धती मध्ये आप्त  युक्ती प्रत्यक्ष व अनुमान  प्रमाणाचा वापर केला आहे .
यापैकी युक्ती म्हणजे अनेक कारणांवरून एका कार्याचा बोध घेणे होय.

केन्सर  मध्ये उत्पन्न होत असलेल्या गाठी पूर्वीपासून होत्याच
त्यांना अर्बुद, ग्रंथी आदी रोगंमध्ये गणता येते
यकृता ची विकृत वाढ जाली की उदर होतो आयुर्वेदाला माहित होते.
हे व असे अनेक रोगांची लक्षणे आधुनिक कैंसर शी जुळतात

याशिवाय कैंसर ची चिकित्सा करताना
A )रुग्णा चे आयुष्यमान वाढ
B )शिल्लक आयुष्याची गुणवत्ता सुधारणे better quality of life
C )chemotherapy radiation मुळे होनाऱ्या  sideeffects वर चिकित्सा
D )या रोगामधील व चिकित्सेदार्म्यान होणार्या वेदना वर नियंत्रण
E )रोगाचा पुनारुद्भाव होउ नए
F )रोग पूर्ण बरा व्हावा यासाठी प्रयत्न

यामधील जितक्या शक्य असतील तितक्या बाबींचा विचार करून
रुग्णाला कोणत्याही स्वरुपाचे खोटे आश्वासन न देता 100% आयुर्वेदाची चिकित्सा केली जाते
पुण्या मधील ज्येष्ठ वैद्य दिलीप गाडगीळ हे यास्वरुपाची चिकित्सा यशस्वी रित्या करीत आहेत
तसेच बार्शी येथील नर्गिस दत्त कैंसर हॉस्पिटल मध्ये आयुर्वेद विभाग सुरु आहे
तेथे वैद्य गाडगीळ  व आदरणीय वैद्य समीर जमदग्नी काम करत आहेत
http://www.ndmch.org/doctors/view-profile-for/drgadgil-dilip-prabhakar-.html
http://www.ndmch.org/doctors/view-profile-for/drsamir-jamdagni.html

वाघोली येथे भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट चे प्रसिद्ध वैद्य स प्र सरदेशमुख व प्रसिद्ध oncologyst डॉ अरविन्द कुलकर्णी यांच्या एकत्रित प्रयत्नाद्वारे सुसज्ज असे आयुवेदीय कैंसर होस्पिटल चालवले जाते ज्याचे उद्घाटन भारताच्या तत्कालीन राष्ट्रपति प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले
  जेथे आता  radiation unit आहे
येथे केन्सर रिसर्च सेंटर ही सुरु आहे.
येथे कैन्सर वर पंचकर्म चिकित्सा अशा अजुन एक हॉस्पिटल चे बांधकाम चालू आहे
http://ayurved-for-cancer.org/home.aspx

अशा प्रकारे आधुनिक शास्त्राबरोबर प्राचीन ज्ञानाचा उपयोग करून केंसार सारख्या असाध्य रोगावर आयुर्वेदीय  चिकित्सा केली जाते.

2 पुढील प्रश्न म्हणजे आयुर्वेदाची औषधे clinical trial मधे पास का होत नाहीत

या विषयी  सुरु असलेले प्रयत्न त्यातील अडचणी या विषयी  उत्तम लेख आधीच लिहिले  आहे त्यामधे सर्व मुद्द्यांचा अंतर्भाव आहे
Article 1
Article 2
Article 3

बहुकल्प बहुगुण अशा आयुर्वेदीय औषधाची टेस्ट घेण त्यातील variables अनेक असल्याने कठीण आहे
आयुर्वेद चिकित्सा रोगा प्रमाणे रोग्यावर ही तितकीच अवलंबून असल्याने one disease one drug असे करणेही अतिशय कठीण आहे.

clinical trial वर पास होउ न शकणारी पण वर्षोन वर्षे उपयोगी ठरलेली औषधे ही गुणकारी नाही असे मानणे म्हणजे टी20 मध्ये खेळता येत नाहीं म्हणून राहुल द्रविड़ हा निरुपयोगी फलंदाज आहे असे म्हणण्यासारखे आहे.
शैली मध्ये बदल केल्यावर त्यानेही नवीन प्रकारत यश मिळवाल्याचे दिसते
खेळ  एकच आहे ,त्यातील नवीन नियामत बसत नाहीत म्हणून आधी केलेले कार्य नाकारणे संकुचित मनाचे लक्षण आहे.

हे म्हणजे परदेशातून आलेल्या सामान्य माणसाने भारतीयाना त्याची परदेशी भाषा येत नाही म्हणुन भारतीय अडाणी गुणवत्ताहीन व मंद बुद्धी आहेत असे जगाला सांगत फिरंण्या सारखे आहे
अशी विधाने केवळ अभ्यासहीन उथळ वाटतात

आयुर्वेद ग्रंथात वर्णन असलेल्या गुटी वटी काढ़े गुगगुल घृत आसव अशा कोणत्याही औषधांची निर्मिती करण्याची परवानगी भारत सरकारने आयुर्वेद औषधी कंपन्यांना दिलेली आहे.
अशा वेळी त्याच औषधावर clinical trial घेण्या साठी लागणारा करोडो रुपयांचा खर्च  कोणी करावा?
अशा संख्याशास्त्रीय चाचण्यामधून मिळणारेज्ञान वादातीत आहे खरे पण भारता सारख्या  गरिबीने ग्रासलेल्या देशाला असा खर्च  परवडेल का?
खरी ज्ञानतृष्णा असेल तर clinical trials व statistical data ची नुसती मागणी करण्या पेक्षा त्यासाठी लागणारा निधी जमावून  संस्थांना  मदत केली पाहिजे.


आरोप आयुर्वेदाला आधुनिक परिभाषेचे वावडे आहे

सुश्रुत संहितेमधे
एकं शास्त्रं अधीयानो न विद्यात शास्त्र निश्चयः।
तस्मात् बहुश्रुतम शास्त्रम विजानीयात चिकित्सकः।।

एका शास्त्राने शास्त्र निश्चय होंत नहीं म्हणून वैद्याने अनेक शास्त्रांचा अभ्यास करुन मग चिकित्सा करावी असेच सांगीतले आहे
आयुर्वेदाने अनेकांत वाद मानालेला आहे
आयुर्वेदाचे अध्ययन अध्यापन करताना आयुर्वेदीय  परिभाषेचा वापर व्हावा हा आग्रह अवस्ताव नाही. सर्वच शास्त्रा मध्ये शास्त्रीय भाषेचा वापर केला जावा हा संकेत आहे.
लेखकाला कदाचित माहिती नसेल पण एका आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याला microbiology व biochemistry सोडून जवळजवळ MBBS इतकाच आधुनिक शास्त्राचा भाग अभ्यासाला असतो.

असे असताना आधुनिक परिभाषेचा निषेध केला जातो असे का वाटते ते कळत  नाही
व्यवहारत  routine exam पासून अत्याधुनीक तपस्ण्यांचा  उपयोग objective parameter म्हणून  वैद्य करतात,
गरज पडल्यास रुग्णाला
तज्ञ आधुनिक शास्त्राच्या  डॉक्टर चा सल्ला घेण्यास प्रवृत्त करतात,
यशस्वी रित्या दोन्ही शास्त्रांचा वापर करताना आयुर्वेदीय वैद्य दिसतात मग असे असताना
पाश्चिमात्य संस्कृतीचा धिक्कार असे मत आहे असे का वाटते?
जे चांगले आहे ते चांगलेच म्हणाले पाहिजे. आपणास समजत नाही म्हणून वाईट म्हणणे आयुर्वेद शास्त्राला मान्य नाही .इतकेच काय केवळ  आयुर्वेदा विषयी आहे म्हणून कोणताही  ग्रंथ चांगला असा मानू  नका असाच शास्त्र सांगत
आयुर्वेदातीलच एक वाचन बघा
ऋषी प्रणीते प्रितिःचेत मुक्त्वा चरकसुश्रुतौ I 
भेडादयाः किं न पठ्यन्ते तस्मात ग्राह्यं सुभाषितम् II 
ऋषी मुनींनी लिहिले आहे म्हणून काहीही चांगले मानावे असे असेल तर चरक सुश्रुत सोडून  भेड जतुकर्ण क्षारपाणी   आदी मुनींच्या संहितांचा अभ्यास कोणी का करत नाही? म्हणून  जे चांगले आहे तेच घ्यावे.
तात्पर्य- चरक सुश्रुत, मुनी होते म्हणून नाही तर त्यांचे ग्रंथ खरोखरच चांगले आहेत म्हणून अभ्यासले जातात.

या उलट
allopathy च्या डॉक्टर नी गुंतागुन्ती च्या case मध्ये आयुर्वेदाचा उपयोग अथवाशिक्षित वैद्याचा सल्ला घेतल्याचे दिसते का?
"आता आमचे प्रयत्न संपले आता दुसरीकडे काही होते का बघा" असे म्हणण्याची  वेळ येइपर्यन्त का वाट बघीतली जाते?
इतर शास्त्राची मदत घेण्यात आपल्याला कमीपणा वाटतो का?
आपल्या शास्त्रामध्ये  असाध्य सांगीतलेल्या रोगांचा उपचार इतर पद्धतीने होंत आहे हे बघून आपला अहंकार दुखावला जात आहे का?
असाध्य असा आजार जर इतर pathy ने बरा झाला तर त्याला its a miracle असे म्हणून सोडून का दिले जाते?
या मुळे कळत नकळत आपल्या हातून रुग्णाचे नुकसान तर होत नाहीये ना?
का आपले शास्त्र सोडून दुसरे काही खरे असूच शकत नाही असा superiority complex किंवा दुराभिमान आपल्याला येतो आहे का?

हा समस्त वैद्यकीय शाखांच्या वैद्य वर्गानी चिंतन करण्याचा विषय आहे
आपले पूर्वाग्रह बाजूला ठेउन एकत्रित काम करणे ही काळाची गरज आहे.

अमेरिका / परदेशात आयुर्वेद का नाही? 

उत्तर wikipedia -Ayurveda_in_America http://en.wikipedia.org/wiki/Ayurveda_in_America

आयुर्वेद हे संपूर्णपणे भारतीय शास्त्र आहे .
इतर शास्त्र प्रमाणेच आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार काळाच्या ओघात होत आहे. भारताच्या सर्वात जवळच्या देशात श्रीलंका भूतान नेपाल यामध्ये आयुर्वेद खूप प्रमाणात आहे.
मध्य पूर्व आशिया मध्ये ८व्या शतकात सुश्रुत संहितेचे अरेबिक भाषांतर झाले व नंतर आयुर्वेद युरोप मध्ये पसरला.
जगभरात अनेक देशामध्ये त्यांची स्वतःची  traditional medicine आहे.
 Traditional_medicine

आज परदेशामधुन भारत व भारतीय कला ,शास्त्र  संस्कृती याविषयी कमालीची उत्सुकता आहे.
आयुर्वेदही याला अपवाद नाही
यूरोपमधील जर्मनी मध्ये आयुर्वेदाचे सगळ्यात जास्त काम चालते
आयुर्वेदाच्या  ग्रंथांची मूल प्रत जर्मनी मध्ये आहे तिथेच critical edition चे ही काम चालू आहे.जर्मनीमध्ये अनेक वैद्य आयुर्वेदीय चिकित्सा करतात

ऑस्ट्रिया देशमधुन अनेक विदयार्थी पुण्यात आयुर्वेद शिकायला येत आहेत
याशिवाय russia नेदर्लंद इंग्लैंड इटली या देशाताही आयुर्वेद चिकित्सा केली जाते
संपूर्ण यूरोप भर असलेल्या आयुर्वेद व पंचकर्म केंद्राची माहीती इन्टरनेट वर उपलब्ध आहे
अमेरिकेमध्ये कैलिफोर्निया मध्ये आयुर्वेदाचे कॉलेज आहे व राज्यराज्यनुसार मर्यादित प्रमाणावर आयुर्वेद उपलब्ध आहे
दक्षिण अमेरिकेमध्ये ब्राज़ील येथे आयुर्वेदाचे काम चालते.

जापान मधे ही आयुर्वेदाच्या संस्था आहेत व तेथील अनेक लोक भारतात येउन उपचार करून घेतात
ऑस्ट्रेलिया मधेही आयुर्वेदाच्या अनेक संस्था असून आयुर्वेद चिकित्सेलाही परवानगी आहे
श्रीलंकेने 2 वर्षापुर्वी आयुर्वेद वर्ष जाहीर केले होते
याचा उद्देश परदेशी पर्यटकाना आयुर्वेदाकडे आकर्षित करून परकीय चलन मिळवणे हाच होता
याशिवाय सर्वजगभर मोठमोठ्या पंचतारंकीत सप्तातारंकीत होटेल मध्ये relaxation therapy म्हणून अभ्यंग शिरोधारा इत्यादी आयुर्वेदीय उपचार दिसून येत आहेत .

जगभरातील विविध आयुर्वेदीय संस्थाची माहिती बघा परीक्षा देऊन
Ayurveda across the world

 परदेशी शास्त्राची  संपूर्ण खात्री पटल्याशिवाय कोणताही देश मान्यता देत नाही. एवढेच कशाला ज्या अमेरिकेची आपण चर्चा करतोय तेथे आपल्या MBBS ला ही practice करण्याचा हक्क नाही.त्यासाठी वेगळी परीक्षा  देऊन २-३ वर्षे residancy करावी लागते.  अशा देशात आयुर्वेदाची काय कथा.

आयुर्वेद अमेरिका किंवा युरोप मध्ये का नाही हा प्रश्न नाही आहे, प्रश्न आहे भारतीय असूनही आयुर्वेद भारतीयांच्या मध्ये तरी आहे का ?

WHO

WHO वर्ल्ड हेल्थ आर्गेनाईजेशन ने आयुर्वेदाला मान्यता दिली असून Health या शब्दाची व्याख्या करताना

 समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः । प्रसन्नत्मेन्द्रियमनाः स्वस्थ इत्यभिधीयते ॥ सुश्रुत

या आयर्वेदीय सूत्राचा वापर केला आहे.
अधिक माहिती साठी  पुढील लिंक जरूर वाचा
Health defination

आयुर्वेद शिक्षणाविषयी WHO चे मार्गदर्शन
guidline by WHO
Contribution Of WHO in global acceptance of Ayurveda


पुढील लिंक मध्ये धोरणासंबंधी विस्तृत माहिती आहे.

http://apps.who.int/iris/bitstream/10665/92455/1/9789241506090_eng.pdf?ua=1

पुढील उतारा WHO च्या आयुर्वेद व इतर भारतीय पारंपारिक वैद्यकीय महाविद्यालया बद्दल च्या धोरणामधून copy paste केला आहे

आयुर्वेदाची महाविद्यालाचे व्यवस्थापन 
In India, all six traditional systems of medicine with official recognition
(Ayurveda, Yoga, Naturopathy, Unani Medicine, Siddha and Homeopathy)
have institutionalised education systems. India has 508 colleges with an
annual admission capacity of 25 586 undergraduate students, 117 of these
colleges also admitting 2493 postgraduate students. Colleges can only
be established with the permission of central government and the prior
approval of their infrastructure, syllabi and course curricula. Annual and
surprise inspections ensure that educational and infrastructural standards
are met. Central Government has the power to recognize or rescind any
qualification and college.


आरोप
आयुर्वेदीय औषधांना  side effect नाहीत कारण त्यांना effect च नाही.त्याचे कुठे ही dose, side effect चे वर्णन नाही

सर्व प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की जगात प्रत्येक गोष्टीला effect व side effect आहेत व ते त्या वस्तुंच्या मात्रा गुणवत्ता व उपयोग करण्याच्या अवस्थेवर अवलंबून आहेत

जीवनाला अत्यावश्यक असे पाणी खूप जास्त सेवन केले तरwater intoxication होउन hyponatremia अशी परिस्थीती निर्माण होउन मृत्यु ओढवू शकतो
Water_intoxication

हीच परीस्थिती आयुर्वेदीय औषधांची आहे
योग्य मात्रेत वैद्याच्या सल्ल्याने औषध घेतले तर दुष्परीणाम होत नाहीत.
औषध निर्मितिच्या वर्णनाबरोबर त्याची सेवन मात्रा ,अतीसेवानाचे  दुष्परीणाम त्या अवस्थाचे नियोजन अशी माहिती सविस्तार दिलेली आहे.   औषध देण्याचा अधिकार केवळ वैद्यालाच आहे.
व्यवहाराच्या दृष्टीने हे परिपूर्ण आहे.
अशिक्षित किंवा अर्धशिक्षित लोकानी अश्या प्रकारचा अभ्यास न करता आयुर्वेदीय औषधांचा वापर केला व त्याचे दुष्परिणाम झाले .  तर त्याचा दोष शास्त्राला देऊ नये . कोणतेही आयुर्वेदीय अथवा हर्बल औषध घेण्या पूर्वी जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यावा. 
औषध घेण्यापूर्वी ते औषध ग्रंथोक्त आहे की कोणीतरी स्वतंत्र बुद्धी ने बनवले आहे हे तपासून बघावे .
आयुर्वेदीय औषधांचा चुकीचा वापर केला तर दुष्परिणाम नक्की होऊ शकतात.

is ayurveda medicine safe? या लेखात उत्तम प्रकारे आयुर्वेदा ची माहिती आधुनिक अनुषंगाने दिली आहे
is Ayurveda safe

आयुर्वेदीय द्रव्यांचे standardization झाले पाहिजे यामध्ये दुमत नाही व तसे प्रयत्न ही चालू आहेत ,
 clinical trials आयुर्वेदाचा अभ्यास केलेल्या तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या तर काहीतरी हाती लागेल.

अजुनही ज्यांना आयुर्वेद औषधे म्हणजे 100% प्ल़ासिबो आहे व त्यास काहीही गुण नाही असे वाटते त्यांनी इच्छाभेदी नावाचा औषध स्वतःच्या जबाबदारीवर घेउन बघाव.
एक ही दिन में दूध का दूध और पानी का पानी हो जायेगा.

आयुर्वेदात शरीर रचनेचे वर्णन नाही
चरक संहिता व सुश्रुत संहिता या मध्ये शारीर स्थान असे एक वेगळे स्थान आहे
सुश्रुत हे  शल्यचिकित्सक असल्यामुळे सुश्रुत संहिते मधील शरीर स्थान श्रेष्ठ  मानतात
डिसेक्शन ला परवानगी नसली तरीही सुश्रुत संहिते मध्ये शव संरक्षण व विछेदानाची माहिती शरीर स्थानामध्ये आली आहे. (Susruta was, however, able to bypass this decree and achieve his remarkable knowledge of human anatomy by using a brush-type broom, which scrapped off skin and flesh without the dissector having to actually touch the corpse.)
Anatomy in Ayurveda

संख्या शारीर
सिर धमनी यांचे वर्णन
गर्भ निर्मिती या बद्दलची माहिती
मर्म विज्ञान
अशा विषयांची सखोल माहिती देणारे अध्याय आहेत
जर सुश्रुलाताला शरीर रचनेची माहिती नसती तर त्याला आधुनिक Plastic surgery चा जनक आधुनिक विज्ञानाने कसे मानले असते?

Sushruta Surgical_procedures_described


आयुर्वेद कालचे विज्ञान , आजचा इतिहास आहे 


हा आरोप बघून हत्ति व सात आंधळे यांची गोष्ट आठवते ज्याला जो भाग हाताला लागला त्याच्या मते हत्ति  म्हणजे तोच भाग.
आज हत्ती म्हणजे आयुर्वेद व पूर्वाग्रह दूषित असलेले सगळे आन्धळे.
कोणाला आयुर्वेद टाकाऊ कोणाला बामणी शास्त्र कोणाला psudo science कोणाला इतिहासजमा वाटते

आयुर्वेद नक्कीच जुने आहे परंतु टाकाऊ नक्कीच नाही
काळ बदलला तरी आयुर्वेदाची चिकित्सा सूत्र अजूनही तशीच आहेत. 
आधुनिक विज्ञान  कळत नकळत आजही  आयुर्वेदीय तत्वाचा वापर करत आहे
उदाहरण-
१)आयुर्वेदीय स्वेदन चिकित्सा  -Hyperthermia_therapy
२) मांस वृद्धी रोगामध्ये शस्त्र -SURGERY क्षार- CHEMOTHERAPY अग्नीकर्म  -Hyperthermia_therapy
३) रक्तमोक्षण या चिकित्सेचा उपयोग Hemochromatosis-Treatment मध्ये अजूनही केला जातो . 
जलौकाचरण रक्तमोक्षणा साठी जळू चा वापर leech therapy

आयुर्वेदाचे ग्रंथ म्हणजे चार कुडमुड्या वैदुनी पाळा मुळा पासून केलेले उपचारांचे एकत्रीकरण नव्हे , आयुर्वेद म्हणजे कुशाग्र बुद्धीच्या वैद्यांनी  वर्षानुवर्ष निरीक्षण प्रयोग  याच्या अंती काढलेले शास्त्रीय निष्कर्ष यांचे एकत्रीकरण आहे.

आधुनिक विज्ञान नवनवीन प्रयोग शोध यामुळे सतत बदलत आहे.
अजूनही what is real. सत्य म्हणजे काय. याचीही  परिभाषा निश्चित नाही .
म्हणून सारासार विचार न करता जुना ते सगळ टाकाऊ आणि नवा ते सगळ सुंदर अशी एकांगी भूमिका योग्य वाटत नाही. 


एक सुंदर सुभाषित आहे

दृष्टं किमपि लोकेऽस्मिन् न निर्दोषं न निर्गुणम्।
आवृणुध्वमतो दोषान् विवृणध्वं गुणान् बुधा : ॥

हे बुद्धीमान लोकांनो, या जगात कुठलीही गोष्ट दोषरहित किंवा काहीच गुण नाही अशी नसते. [प्रत्येकामध्ये थोडे गुण आणि थोडे दोष असतातच. कुठलीच गोष्ट निर्दोष नसते ] म्हणून दोष झाका [त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ] आणि गुणांचा विस्तार करा. [त्या माणसाचे गुण वाढतील असे बघा. ]


शेवटी
या लेखाचा उद्देश आपले हृदयपरिवर्तन  करण्याचा किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा शास्त्रावर टीका करण्याचा नाही.
किंवा आयुर्वेदाची भलावण करणे हा नाही परंतु आयुर्वेदाची सद्यस्थिती  लोकांपर्यंत पोचवणे हाच आहे.

आयुर्वेदाचा अभ्यास न करता त्याविषयी भाष्य करणारया व पुराव्याशिवाय गंभीर आरोप करणाऱ्यांना   व अवास्तव क्लेम्स करणारया ना बळी पडू नका.
वर्तमान पत्र हे medical journal नाही त्यातील लेखावर अंध विश्वास ठेवू नका. TV किंवा अन्य प्रसार माध्यमे रेल्वे स्थानक यामधील जाहिरातीवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका ,ओळखीचे लोक, रस्त्याच्या कडेला तंबूतील  खानदानी दवाखाने  या मधून विकतचे किंवा  फुकटचे  मिळणारे सल्ले, गुण आला नाही तर पैसे परत अशी औषधे  यांच्यातील सत्यासत्यता पडताळून बघा.
मनात शंका आल़ी तर जवळ च्या शिक्षित वैद्याला भेटा माझी खात्री आहे तो तुमची शंका नक्की दूर करेल

पुन्हा पुन्हा सांगितल्यावर असत्य सुद्धा सत्य वाटू लागत
म्हणून दिखावे पे मत जाओ खुदकी अकल लगाओ असे सांगावेसे वाटते

असे असुनही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व

हे वाचून आपल्यापैकी एकाच्याही मनात आयुर्वेदाविषयी जिज्ञासा निर्माण जाली तर मला जरुर संपर्क करा
लेख आवडला तर आपल्या मित्राना सांगा
आवडला नाही तर मला जरूर सांगा

नमस्कार

वैद्य प्रभाकर यशवंत शेंड्ये
BAMS MA Sanskrit